PostImage

सुपर फास्ट बातमी

Sept. 1, 2024   

PostImage

Gadchiroli: चार पोलिस निरीक्षकांना हटविले


 

 

गडचिरोली :

जिल्ह्यातील चार पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना हटवून नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. ३० ऑगस्टला पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी याबाबतचे आदेश जारी केले.

 

आरमोरी, अहेरी, कोरची व चामोर्शी येथील प्रभारी अधिकाऱ्यांना नव्या नियुक्त्या करण्यात आल्या. आरमोरीचे पो. नि. विनोद रहांगडले यांची नक्षल सेलमध्ये बदली केली असून, त्यांच्या जागी अपर अधीक्षक यांच्या कार्यालयातील वाचक कक्षाचे प्रभारी कैलास गवते यांची नियुक्ती केली

 

. अहेरीचे पो. नि. दशरथ वाघमोडे यांची गडचिरोली अपर अधीक्षक कार्यालयात वाचक कक्षाचे प्रभारी म्हणून बदली झाली. त्यांच्या जागी गडचिरोलीतील कोर्ट पैरवी व पो. नि. स्वप्नील इज्जपवार यांची नियुक्ती झाली. कोरची ठाण्याचे पो. नि. चंद्रकांत वाबळे यांची कोर्ट पैरवी म्हणून बदली झाली. चामोर्शीचे पो. नि. विश्वास पुल्लरवार यांची यूएपीए

सेलमध्ये बदली केली आहे. अहेरी ठाण्याचे परीविक्षाधीन उपनिरीक्षक रोहन जावळे यांची जारावंडी ठाण्यात बदली करण्यात आली. गॅरापत्ती पोलिस मदत केंद्रातील परीविक्षाधीन पोलिस उपनिरीक्षक सचिन तोटेवाड यांची विशेष अभियान पथकात बदली करण्यात आली तर उपनिरीक्षक ज्ञानेश्वर देवकते यांची विशेष अभियान पथकातून गॅरापत्ती पोलिस मदत केंद्रात नियुक्ती केली.

 

चामोर्शी, कोरची ठाण्यातील नियुक्ती बाकी

दरम्यान, चामोर्शी व कोरची येथील विद्यमान प्रभारी अधिकाऱ्यांना हटविल्यानंतर तेथे नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती अद्याप बाकी आहे. तेथे कोणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.